कॉमेडियन अॅक्टर कपिल शर्माचा शो बंद झाला असला तरी लोकांना वाट पाहायला लावण्याची त्याची सवय काही गेलेली नाही. काही दिवसांपूर्वी कपिलने अक्षय कुमारला 5 तास वाट पाहायला लावली. कपिलची अपकमिंग फिल्म 'फिरंगी'च्या प्रमोशनसाठी तो अक्षय कुमारचा 'शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'साठी शूट करणार होता. मात्र तो वेळेवर सेटवर पोहोचला नाही त्यामुळे त्याच्याशिवाय शो शूट करण्यात आला अक्षय कुमारची इच्छा होती की या स्पेशल शोची शुटिंग सकाळी लवकर केली जावी. मात्र कपिलच्या टीमने शेड्यूल बदलून मागितला आणि 11 वाजता शूट करण्याचे ठरले पण दुपारी 2 पर्यंत कपिलच्या टीमला माहित नव्हते की तो कुठे आहे कपिल न आल्यामुळे ऐनवेळी स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात आला आणि शो शूट झाला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews